दि ३० सप्टेंबर
धर्माबाद तालुका प्रतिनिधि
धर्माबाद ( गजानन वाघमारे) जगाला शांतीचे आणि मानवतेचे संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांची जयंती शनिवार सकाळी ९:३० च्या सुमारास बुऱ्हान शाह च्या दर्गा येथून काढण्यात आली धर्माबाद येथे ईद-ए-मिलादुन्नबी आज उत्साहात साजरा करण्यात आली असून मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांनी आपल्या प्रेषित पैगंबर च्या घोषणा देत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
ईद-ए-मिलाद हा सन मुस्लिम बांधवांचा मोठा सण आहे..
सत्य,अहिंसा, व शांतीचा मार्ग दाखवणारे पैगंम्बर यांच्या या जयंतीनिमित्त मुस्लिमबांधव या उत्साहात सामील झाले होते..
या मिरवणूकित जेष्ठ नागरिक व लहान मुलांची उपस्तिथी मोठ्या प्रमाणात होती..
धर्माबाद शहर पताके, बॅनर, व झेंड्यानी सजले होते..
शहरात अनेक ठिकाणी आज बिस्कीट,फळ,नाश्ता, व पाणी पाऊच वाटण्यात आले..
ही मिरवणूक शहराच्या जामा मस्जिद पासून पोलीस स्टेशन समोरून पानसरे चौक ते कब्रस्तान येथे गेल्यानंतर समाप्त करण्यात आली..
या भव्य रॅलीत शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती..स्वछता अभियानाअंतर्गत सफाई करण्यात आली..
रत्नाळी,मौलालि नगर, बाळापूर, गांधी नगर, शिवाजी नगर,रामेश्वर, फुले नगर रजा नगर, व धर्माबाद शहर येथील मान्यवरानीही या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला..
या वेळी धर्माबाद येथील सर्व मस्जिदचे सदस्य यांची मुख्य उपस्थिती होती.
या वेळी माजी नगर अध्यक्षाचे पती सत्तार सेठ, माजी शिक्षण सभापती समीर भाई,हाजि सय्यद अल्ताफ दारलूम सदर ,पत्रकार म.मुबशीर, सय्यद इलियास,ज्येष्ठ पत्रकार मिसाळे सर, पत्रकार बाबुराव पाटिल ,बालाजी कुदाळे , अब्दुल खादीर, मो नाहेद,जाविद सर,किरण गजभारे, काँग्रेस चे ताहेर पठाण,वाजिद अली राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तोफीख शेख उर्फ,( इज्जू) एम आय एम चे शेख इरफान, समीर ,अझहर करखेली,नविद अहेमद ,सय्यद अन्सार, सुधीर येलमे, इंजिनिअर म.मोईजोद्दीन, डॉ.तोफिक पठाण, मुखीम , मातीन , व मुस्लिम समाजाची मोठया संख्येने उपस्थती होती मिरवणूक संपल्या नंतर ईद ए मिलादुन्नबी चे कार्यक्रम शांतेत संपन्न झाल्यावर मुस्लीम समजाकडून पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले यावेळी पोलीसांचा कडक बंदोबस्तों होता .