बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया प्रतिनिधी
दि .22
याबाबत सविस्तर वृत असे की, जोत्सना काळे या विद्यार्थिनीने फर्ग्युसन काॅलेज मधून B.sc. चे शिक्षण पूर्ण केले आहे. जोत्सना काळे हीने मागासवर्गीय प्रवर्गातून फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. प्रवेशावेळी महाविद्यालयाने जोत्सना काळे या विद्यार्थीनीकडून प्रवेश फी व इतर फी आकारली होती. या विरोधात विद्यार्थीनीने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पुणे यांच्याकडे फर्ग्युसन कॉलेज ची व व्हिसेंट हायस्कूल अॅ जुनिअर काॅलेज ची तक्रार केली होती. सहा. आयुक्त पुणे यांनी याबाबत ठोस पावले उचलली आहेत. याबाबत सहाय्यक आयुक्तांनी सामाजिक न्याय विभागाच्या 1 नोव्हेंबर 2003 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत दि. 19/10/2023 रोजी पत्र काढत या दोन्ही महाविद्यालयांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक न्याय व विभागाच्या दि. 1 नोव्हेंबर 2003 च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी व इतर फी महाविद्यालयांनी घेऊ नये असे निर्णय असताना महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी व इतर फी आकारली जाते. ही बाब अतिशय गंभीर असल्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.