सोलापूर : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वस्त्र दालन……. व्ही. आर.पवार सारिज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आणि त्यांच्याच शुभ हस्ते देवीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
चाटी गल्ली येथील व्ही.आर. पवार सारीज या दालनामध्ये संपन्न झालेल्या या महाआरती करेक्रमास प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा सोलापूरचे डीसीपी दिपाली काळे, प्राचार्य व पोलीस प्रशिक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरटीओचे डेप्युटी चार्ज असलेले अर्चना गायकवाड, पोलीस आयुक्त यांच्या सुविधा पत्नी रूपाली माने, इनरव्हील क्लबच्या अनुराधा चंडक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी अग्रजा चिटणीस, आय. एम. एस. च्या सायली जोशी तसेच स्टाईल मंत्रा सलून च्या सोनल पांचाळ यांच्या हस्ते शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजा भवानी देवीची महाआरती करण्यात आली.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत व्ही आर पवारचे संचालक महेश पवार , गिरीश पवार, अमर पवार यांनी केले. तर तर या कर्तबगार महिलांचा सत्कार सुलोचना पवार, सुनिता पवार, दीपा पवार, गीता पवार, स्नेहा पवार व प्रियांका पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमा वेळी वरील मान्यवर बोलत असताना म्हणाले की एकत्र परिवाराचे किती महत्त्व आहे पवार कुटुंब एकत्रित असल्यामुळे आज महाराष्ट्रात व्ही.आर. पवार सारीज हे ब्रँड बनले आहे. आहे हे केवळ एकीचे बळ असून असेच उत्तरोत्तर आपले प्रगती व्हावे अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना दीपक पवार यांनी केले तर आभार ऋषिकेश पवार यांनी मानले. कार्यक्रमास कार्यक्रमास मित्रपरिवार व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही.आर.पवार फॅमिली तसेच कर्मचारी यांनी प्रयत्न केल.