धर्माबाद (वार्ताहर) सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावी मनोज जिरांगे यांनी उपोषण सुरू केले असून आज आठवा दिवस आहे.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धर्माबाद येथे तीन दिवसापासून साखळी उपोषण सुरू असून आज दि.एक नोव्हेंबर रोजी धर्माबाद बंद कडकडीत बंद करून पाठिंबा दर्शविला आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
सकल मराठा कार्यकर्त्यांनीमोटार सायकल रॅली काढून पाहणी केली आसता व्यापारी लोकांनी दुकान उघडलेच नाही,धर्माबाद सर्वत्र दुकान बंद होती. व्यापारी लोकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
आज तिसऱ्या दिवशी मौ. बाचेगाव, राजापूर, पांगरी व जुनी येथील कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे.
धर्माबाद तालुक्यात सालेगाव, पांगरी, माष्टी व कारेगाव येथे साखळी उपोषण चालू असून सरकारचा तीव्र निषेध करीत आहेत. धर्माबाद बंदला 100% पाठिंबा मिळाला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली आहे.