प्रतिनिधी सातारा दि .4
याबाबत सविस्तर वृत असे की, अमोल विष्णू जगताप व सुप्रिया रवींद्र दळवी (मु. पो. जाधववाडी, ता. फलटण, सातारा) यांनी दि. 1/6/2023 रोजी समाज कल्याण विभाग जि. प. सातारा यांच्याकडे केंद्र शासनाच्या आंतरजातीय विवाह अनुदान योजनेसाठी परिपूर्ण प्रस्ताव दाखल केला होता. प्रस्ताव दाखल करून 5 महिने झाले, परंतु वारंवार पाठपुरावा करूनही समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी सदर प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही केली नाही. आंतरजातीय विवाह अनुदान योजना ही केंद्र शासनाची योजना असून समाजकल्याण अधिकारी यांनी लाभार्थ्यांचा हा प्रस्ताव लग्नाच्या 1 वर्षाच्या आत केंद्र शासनाकडे सादर करायचा असतो. परंतु समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केल्याने अर्जदार सुप्रिया दळवी व या अनुसूचित जातीच्या महिलेने दि.4/10/2023 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा यांना चौकशी चे आदेश दिले होते. परंतु अद्यापही लाभार्थ्यांच्या प्रस्तावावर सपना घोळवे यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. याबाबत समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे ह्या जिल्हाधिकारी सातारा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते.