जालना, (दि. 18)
आॉल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या आदेशानुसार पक्षाच्या जालना जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी (जालना) यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीच्या PhD विद्यार्थ्यांची बार्टी कडील प्रलंबित फेलोशिप, स्वाधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नाॅन क्रिमिनल ची अट रद्द करावी, अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र बजेट चा कायदा करावा, विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात निर्माण होणाऱ्या गैरसोयीसंदर्भात तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाठ, भोकरदन तालुका अध्यक्ष किशोर शेजूळ, भोकरदन शहर अध्यक्ष अनिकेत जगताप आदींच्या सह्या आहेत. यावेळी आॉल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.