अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्ज करण्याचे सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
सातारा दि. 7 : अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. सातारा या जिल्ह्यात या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुल जवळ सातारा 02162-298106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.