निधन वार्ता
धर्माबाद शहरातील जामा मस्जिद चे माजी सचिव इम्तीयाजोदीन पिता अहमदोदीन यांचे दुःखद निधन दिनांक १३ डिसेंबर रोजी निझामबाद येथे झाले आहे.
ते पूर्वीच्या आंध्रा प्रदेश राज्यात आरमुर येथे पंचायत कर्यालयात वर्ग दोन चे अधिकारी म्हणूण कर्तव्य पार पाडले. त्यानंतर त्यांनी त्यांचे मूळ गाव असेलल्या धर्माबाद येथे जामा मस्जिद कमिटीचे कामकाज पाहत आपली निस्वार्थ सामाजिक कार्य शेवटच्या श्वासापर्यंत पूर्णपणे सांभाळले. जामा मस्जिद चे अध्यक्ष डॉ शौकत हुसेन यांच्या निधननंतर ते सचिव म्हणून काम पाहिले.सचिव पदाची जबाबदारी प्रामाणिक पने पार पाडली. अध्यक्ष यांच्या निधन नंतर एकहाती काम करीत कामकाज यशस्वीपने पार पाडले.
त्यांच्या निधनाने मुस्लिम बांधवांत शोक व्यक्त करण्यात आला.एक कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक तसेच निस्वार्थ भावनेतून सामजिक धार्मिक कार्य सांभाळणारी व्यक्ती चे दुःखद निधन झाले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले,साह मुली ,सूना,जावाई, नातु असा मोठा परिवार आहे.दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० निझामबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.