बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
बुलढाणा प्रतिनिधी: सोमवार दिं.18 डिसेंबर 2023 रोजी स्थानिक विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदुरा तालुका व शहर कार्यकारिणी साठी मुलाखत कार्यक्रम घेण्यात आला. सध्या देशातील आणि राज्यातील सरकार भांडवलशाही सरकार असून जिल्हा परिषद शाळा हे विकायला निघाले आहेत, गरीब विद्यार्थ्यांपासून शैक्षणिक हक्क हेरवून घेण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी व आपले शैक्षणिक हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या लढ्याला बळ द्या व संपूर्ण नांदुरा तालुका सम्यकमय करुन कॉलेज तिथे शाखा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबवणार असा संकल्प करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितचे तालुकाध्यक्ष अजाबरावजी वाघोदे तर प्रमुख उपस्थित जि.उपाध्यक्ष भगवान इंगळे, श्रीकृष्ण इंगळे, ॲड.संजय इंगळे, ता.उपाध्यक्ष रमेश ठाकरे, अनिल धुंदळे, तुकाराम रोकडे, अजाबराव गाळे, युवा ता.उपाध्यक्ष अशांत रणित , जेष्ठ नेते प्रकाश इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जि.उपाध्यक्ष सिद्धार्थ शिरसाट, महासचिव रोहन पहुरकर, जि.सचिव राज वानखडे, विकी दामोदर आदी होते. या वेळी वंचितचे जि.महासचिव आतिश खराटे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात 50 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मुलाखती दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशील इंगळे, अमोल तायडे, शुभम नरवाडे, निलेश इंगळे, रोहन गाडे, प्रेम तायडे, आदेश तायडे, प्रतिक वाघ, बुध्दभूषण हाताळकर, रोशन रणीत, प्रेम पारेकर, ओम तायडे, सुपेश वाघ, प्रणव इंगळे, अनुराग ब्रम्हणे, देवानंद इंगळे, युवराज रणित आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वंचितचे नेते गिरीष उमाळे यांनी केले.