मांडवगण फराटा :
गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे दि.२४ रोजी मनोमिलन तथा राज्य कार्यकारणी पुनर्गठन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य अध्यक्ष पदी संजय गव्हाणे, राज्य उपाध्यक्ष पदी संतोष मोरे, राज्य कार्याध्यक्षपदी नंदकुमार पवार, राज्य सचिव पदी शेकूराव वाणी व प्रत्येक जिल्ह्यातुन कोअर कमिटी सदस्य यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच राज्य कार्यकारिणी मध्ये नवनिर्वाचित कोअर कमिटी सदस्य म्हणून शंकर मामा पवार, भाऊसाहेब चौगुले,हनुमंतराव सावंत, धर्मराज गव्हाणे, गजानन महाजन, शेकूराव वाणी, बालाजी गव्हाणे, अंबादास कालापाड, डॉ बाळा कालापाड, मारुतीमामा कालापाड, गोपाळ तागड, पांडुरंग गव्हाणे, विजय नवघरे विलास गव्हाणे,राजाभाऊ गव्हाणे , विश्वानाथ गव्हाणे , मुरलीधर कुंभार, प्रा जगन्नाथ साळी सर, ग्यानदेव भोर,संतोष मोरे सर्जेराव नरवाडे, बबन वाणी, शिवाजी गव्हाणे, तुळशीराम गायकवाड यांची निवड करण्यात आली.
गोपाळ समाजहित महासंघाची स्थापना २०१६ साली होऊन या संघटनेचे संस्थापक हे प्रभाकर तपासे साहेब होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेने समाजहिताची अनेक कामे केले असून त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन संघटना संपूर्ण भारतभर काम करत आहे.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांना स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटून देखील अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. विविध भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या माध्यमातून गोपाळ समाजातील नंदकुमार पवार हे बऱ्याच वर्षांपासून समाजासाठी काम करत आहेत. विखुरलेल्या समाजाला संघटीत करून समाजहिताचे कार्य ते मोठ्या जोमाने करत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पद, तसेच प्रदेशाध्यक्ष पद देखील भूषवले आहे.
भटक्या विमुक्त जातीसाठी अनेक आयोग नेमले गेले त्या त्या आयोगाने केंद्र सरकाकडे शिफारशी देखील पाठवल्या परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने भटक्या विमुक्तांसाठी आयोग लागू केला नाही व आयोगाच्या शिफारशी देखील लागू केल्या नाहीत. परिणामी आजही भटक्या विमुक्तांचे जीवन हे कसरतीचे आहे. सर्वप्रथम यासाठी मी हे काम हाती घेणार असून येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी विविध उपाय योजना व समाज कसा घडेल या दृष्टीने काम करणार असुन गोपाळ समाजाचे आर्थिक महामंडळ असावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र भर गाव तेथे शाखा उभारणार असून गोपाळ समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहणार असा ठाम विश्वास यावेळी नंदकुमार पवार यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी माजी राज्य अध्यक्ष सुभाष गव्हाणे, उपाध्यक्ष गोविंद गव्हाणे, सचिव भरत गव्हाणे, संपर्क प्रमुख संजय भोसले, कोअर कमिटी सदस्य रमेश महाजन, लक्ष्मण कालापाड सर, मारुती गव्हाणे, गोपाल तागड, राजू गव्हाणे, आंबदास वाणी, शेषराव मोरे, बालाजी घोडके, देवेंद्र धनगरे, रविभाऊ गव्हाणे, शांताराम गायकवाड, बाळासाहेब गव्हाणे, संजय नवघरे, बबन वाणी, शंकर कालापाड, अभिषेक गायकवाड,विजय महाजन आदी उपस्थित होते.