सोलापूर ,(दि. 26)
मातोश्री रुक्मिणी फौंडेशन, सोलापूर आयोजित निराधार, गरजू, हुशार तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फौंडेशन सोलापूर आयोजित संविधान गौरव परीक्षेतील पात्र स्पर्धकांना शिष्यवृत्ती प्रदान समारंभ शिवस्मारक सभागृहात माजी आ नरसय्या आडम मास्तर, मातोश्री रुक्मिणी भालशंकर , पोलीस निरीक्षक रईसा शेख, निवृत्त पोलीस अधीक्षक रमेश सरवदे, प्राचार्य आशुतोष शहा, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते आणि समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी लोकराजा फौंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे, नानासाहेब भालशंकर, रमेश लोखंडे, प्रा अशोक पाचकूडवे, शिवाजी जगताप , प्रफुल्ल जानराव,वैजिनाथ लोखंडे,नीलकंठ शिंगे, प्रकाश साळवे, दत्तात्रय शिंदे, प्राचार्य श्रीकांत लांडगे, मुख्याध्यापक सत्यवान पाचकूडवे,मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, इसरो अधिकारी मोनाली बुद्धजय भालशंकर , मुख्याध्यापक विनोद वर,मुख्याध्यापक अविनाश भालशंकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा जोतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारतीय संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन उपाध्यक्ष रवि देवकर यांनी करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन राज्य कर निरीक्षक, अभियंता बोधीप्रकाश गायकवाड आणि प्रा युवराज भोसले यांनी केले तर उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवि देवकर, प्रा अभिजित भंडारे, दाऊत आतार, मिलिंद भालशंकर,सत्यवान पाचकूडवे, कैलास माने, विष्णू लादे, सदानंद कोळी, शिवानंद चौगुले इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.