धर्माबाद (प्रतिनिधी) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान असतांना मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यासाठी जातीय भावनेतून भल्या भल्यांनी विरोध केला.नामांतर लढ्याला एक संघर्षाचा क्रांतिकारी इतिहास आहे.ही लढाई आमच्यासाठी अस्तित्वाची व अस्मितेची होती असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते,नांमातर लढ्यातील साक्षीदार एल.ए.हिरे यांनी केले.
धर्माबाद तालुक्यातील मोजे बन्नाळी येथे रविवार दि.१४ जानेवारी२०२४ रोजी ३१वा नामविस्तार वर्धापन दिन साजरा करण्यात आला.सकाळी च्या सञात जी.पी मिसाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण तर सदानंद देवके व सुभाष कांबळे यांनी पूजापाठ केला आहे. प्रथम भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.जेष्ठ आंबेडकरी नेते एम.सायलूदादा म्हैसेकर यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उध्दघाटन केले.अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जे.के.जोंधळे हे होते.आयोजक शंकरराव वाघमारे यांनी नामांतर वर्धापन दिन साजरा करण्यामागची भूमिका प्रथम आपल्या प्रस्तावेतकातून मांडली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे म्हणाले नामांतरची लढाई हजारो तरूण रस्त्यावर येवून दलित पँथरच्या त्यागातून सुरू झाली.२७जुलै १९७८ला त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव पारित केला.तेव्हा अशोकराव पा.डोणगावकर यांनी नामांतराला विरोध करून मंत्रीपदाचा राजीनामा दिला मराठवाड्यात जातीय आगडोंब उसळला पुरोगामी महाराष्ट्रात जेष्ठ विचारवंत म्हणणारे देखील बाबासाहेबांच्या नावाला विरोध केला यामध्ये स्वातंत्र्यसैनिक गोविंद भाई श्राप,रायभान जाधव,बाळासाहेब ठाकरे,शंकरराव चव्हाण,नरहर कुरुंदकर यांनी तीव्र विरोध करून चिथावणीखोर वक्तव्य केल्याने मराठवाड्यातील जातीवादी मंडळींनी आंबेडकरी जनतेची घरेद्वारे उध्वस्त केली अनेक महिलांवर अन्याय अत्याचार केला.जनार्दन मवाडे,पोचिराम कांबळे यांना जमावाने हलहल करून ठार मारले.कित्येकांचे बलिदान गेले.शहिद पोचिराम कांबळेचा मुलगा चंदर हा बापाच्या खुनाचा बदला वडजे पाटलांचा खुन का बदला खुन करून घेतला.चंदर कांबळे हा माझ्या कडे तीनचार दिवस होता त्याला कोर्ट कामासाठी मी निधी जमा करून दिला.दलित पँथर चळवळीत नांमातरासाठी मोर्चे आंदोलन करतांना अनेक वेळा अटक झाली प्रसगी जेलची हवा मिळाली मुंबईला मोर्चात गेल्यावर रात्रीला कधी कधी व्हि,टी,दादरला पेपरच अथरून करून झोपायचो पोलिस येवून रात्रीला दंडे मारायचे असे त्यावेळचे थरारक चित्र हिरे यांनी आपल्या मनोगतून उपस्थिता समोर उभे केले.ते म्हणाले बाबासाहेबाची विद्वता येथील जात्यांधं लोकांना कळली नाही.शिक्षण घेतानाही बाबासाहेबांना जातीयतेचे चटके सहन करावे लागले! काळाराम मंदिर,चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना सनातन हिंदूंनी त्यांना दगड धोंडे मारले तरी ते फुले म्हणून झेलेली बाबासाहेब हे हिंदू धर्म सुधारक होते त्यांचा लढा गावकुसा बाहेरच्या लोकांना माणसात आणण्याचा आणि हिंदू धर्मातील जातीय विषमता नष्ट करण्यासाठीव होता संविधान लिहिण्यासाठी तेव्हाची काँग्रेस मंडळी बाहेर देशातला व्यक्ती शोधत होती. बाबासाहेबांनी संविधान लिहून सर्व भारतीयांना न्याय लोकशाही स्वातंत्र्य दिले.भाजप राममंदिर, धर्माच राजकारण करीत संविधान बदलण्याच षडयंत्र रचित आहे ते सर्वांनी हाणून पाडले पाहिजे पूर्वी आरक्षण म्हणजे विशिष्ट दलित लोकांसाठीच होते असा समज होता आता तर मराठा समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर येत आहे.गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाव ही आमची भुमिका आहे. ओबीसीनाही बाबासाहेब उशिरा कळत आहेत.
यावेळी बोलताना जि.प.माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर म्हणाले कै.बाळासाहेब ठाकरे हे घरात नाही पीठ कशाला मागता विद्यापीठ असे म्हणाले होते शरद पवारांंना बाबासाहेबाची विध्दता माहीत होती त्यांच्या विषयी अभ्यास होता त्यांनी लिहिलेलं संविधान त्यांना कळालं होत म्हणून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विधापिठाला देण्याचा धाडसी निर्णय घेतला.तेव्हा त्यांना स्वकियांनीच विरोध केला.परिणामी सत्ताही गमावावी लागली तरी त्यांनी नामांतर घडवून आणल गरीब मराठ्या साठी आरक्षणाची गरज आहे बाबासाहेबांचे संविधान सर्वांना न्याय देणारे आहे असे होटाळकर म्हणाले.
यावेळी वंचितचे कमलेश चौदंते संविधान बदलण्याचा खटाटोप चालू असल्याचे सांगितले.उमरीचे माजी नगरसेवक सोनू वाघमारे यांनीही विचार मांडले यावेळी व्यासपीठावर लिंगुराम पाटील, बाबुराव कांबळे, विधाधर घायाळ,सुदर्शन वाघमारे, गंगाधर धडेकर,शेषराव धावने,चंद्रकांत गडपाळे,गंगाधर लव्हाळे,संजय निवडंगे, शाहीर आनंद किर्तने,चंद्रभीम हौजेकर, गौतम देवके,लक्ष्मीकांत वनेकर आदिसह उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार संजय कदम यांनी केले तर आभार विनोद वाघमारे यांनी मानले सभेनंतर प्रसिद्ध गायिका सुनिता कीर्तने व गायक धम्मा सिरसाट यांचा बुद्ध-भीम गिताचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमास महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.