वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने निषेध व निवेदन देण्यात आले.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
बुलढाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथील एका युवकांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल इंस्टाग्राम सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिपणी केल्या प्रकरणी त्या युवकास तात्काळ अटक करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सर्व समाज बांधव हर्षउल्हासात असतांनाच 18 जानेवारी संध्याकाळी च्या सुमारास मंगरूळ नवघरे येथील रहिवासी संकेत घरत नामक एका वीस वर्षे युवकाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सर्वांचे भाषेत इंस्टाग्राम या सोशल मीडियावर कमेंट करून पोस्ट केले हे लक्षात येताच मंगरूळ नवघरे येथील समाज बांधवांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमडापूर पोलीस स्टेशन गाठलेया समयी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय धुरंदर उपाध्यक्ष रघुनाथ गवई ,जितू निकाळजे ,ज्येष्ठ नेते गजानन धुरंधर त्याचप्रमाणे रिपाई जिल्हाध्यक्ष नरहरी भाऊ गवई, आम्रपाल वाघमारे, मयूर मोरे सतीश राजे पैठणे, शिवाजी गाडे ,भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखडे, प्रशांत झिने देवानंद वानखडे अक्षय जाधव, अमडापुर चे सरपंच पती संजय गवई,तसेच शेकडो आंबेडकरी समाजातील मंगरुळ नवघरे येथील सर्व बौद्ध समाजातील महिला व पुरुष बांधवांनी अमडापूर पोलीस स्टेशन गाठले. जोपर्यंत त्या युवकावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली व ठिय्या मांडला त्याच वेळेस अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पाटील यांनी दुय्यम ठाणेदार इंगळे यांच्या समवेत एक पथक घेऊन त्या युवकास अटक करण्यासाठी पाठवले आणि काही क्षणातच त्या युवकास अटक करण्यात आले व त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.यासमयी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व रिपाइं चे कार्यकर्ते उपस्थित होते.