धर्माबाद ( प्रतिनिधी)
येथील नुकतेच नवीन इमारतीत कार्यान्वित झालेल्या पशुवैद्यकीय दवाखानाला शार्टशर्कीट मुळे दि.३ जुन रोजी रात्री १०-०० वाजताच्या दरम्यान एसी बैठक हाल ला आग लागली,यात एसी रुम मधील एसी सह इतर साहित्य जळुन खाक झाले आहे, लाखाचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेची अग्नीशमन गाडी वेळेवर आल्याने पुढील अनर्थ टळला,जीवीत हानी कोणतीही झाली नाही.
शहरातील रेल्वे स्टेशन जवळ कोट्यावधी रुपये खर्च करून पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधण्यात आली.इमारत बांधुन सर्व सोय सुविधा पुर्ण होऊन चार वर्षे उलटले तरीही या इमारतीचे उदघाटन झाले नाही,कसे तरी सहा महिण्यापुर्वी ऑनलाईन उद्घाटन या इमारतीचे झाल्यानंतर पशुवैद्यकीय दवाखाना सहा महिन्यांपूर्वी कार्यान्वित झाला.
इमारतीत सर्व सुविधा देण्यात आले.पण गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव होत असल्याने विद्युत पुरवठा कमी जास्त होऊ लागला व एसी चालू ठेवल्याने सोमवारी रात्री अचानक एसी रुमला शार्टशर्कीट मुळे आग लागली त्यात एसी रुम मधील खुर्ची,टेबल व इतर साहित्य जळुन खाक झाले. ही माहिती मिळताच अग्नीशमन गाडी वेळेवर आल्याने पुढील अनर्थ टळला जीवीत कोणतीही झाली नाही.