धर्माबाद (गजानन वाघमारे) पोलिसांच्या स्वाधीन केलेली वाळूचा हायवा, वाळू माफियांनी कोणालाही न विचारता, डुप्लीकेट चाबी बनवुन, पोलिसांच्या नाकावर टिच्चून, तहसील समोर लावलेला हायवा दि.३ जुन रोजी दिवशा ढवळ्या सकाळी पळवून नेऊन पोलिसांना आवाहन केले आहे.यावेळी धर्माबाद पोलिस ठाण्यात सोमवारी चालकांवर गुन्हा दाखल झाला खरा पण मुख्य मालकाला दिले सोडुन
धर्माबादेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळुची तस्करी दिवशा रात्री होत आहे.दररोज धर्माबाद मार्ग तेलंगणात वाळुची निर्यात होत आहे.पण धर्माबाद वासीयांना वाळू मिळत नसल्याने संतापुन सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत पाटील जुन्नीकर, गणेश गीरी यांनी बेकायदेशीर वाळुने भरुन जात असलेला हायवा क्रमांक MH 21 BH 5710 हा दि.२ जुन रोजी रात्री ८-०० वाजता रेल्वे गेट क्रंमाक दोन जवळ पकडला.यावेळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना फोनद्वारे संपर्क करुनही त्यांनी रिसीव्ह केले नसल्याने वरील दोन अधिकारी बदल संतापाची लाट पसरली. नंतर पोलिसांना संपर्क केला असता साहयक पोलिस निरीक्षक रमेश जाधवार यांनी घटनास्थळी आले. तेव्हा हायवा जाधवार यांच्या स्वाधीन केले.जाधवार यांनी सदरील हायवा तहसील समोर लावुन हायवाची चाबी काढुन घेतली, हायवावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला.रात्रभर हायवा तहसील समोर होता.सोमवारी सकाळी १०-०० वाजताच्या सुमारास कोणी नसल्याचे संधी साधून, कोणाला न विचारता,डुप्लीकेट चाबी बनवुन तहसील समोर वाळुने भरलेला हायवा वाळू माफियाने पळविल्याने खळबळ उडाली आहे..यावर धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपी चालक रमेश बापुराव पवार रा.उमरा ता.लोहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपी फरार असुन मुख्य मालकावर ही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
पोलिसांच्या ताब्यात असलेली हायवा, तहसील समोरून पळवून नेऊन वाळू माफियांनी पोलिसांना आवाहन केले आहे.