धर्माबाद (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर परिसरात असलेल्या ग्रीनफिल्ड नॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आज 9 ऑगस्ट 2024 रोजी नागपंचमी व आदिवासी नायक बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ह्यावेळी येथील वसतिगृहात असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हस्ते आदिवासी नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर सर्व शिक्षक व शिक्षिकानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प वाहिले. व तसेच मुख्याध्यापक शेख खदीर यांनी आदिवासी नायक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या जिवनापर प्रकाश टाकला आणि नागपंचमीच्या सणाबद्दल माहिती सांगितली. ह्यावेळी ज्येष्ठ शिक्षक संतोष इनामदार, ज्येष्ठ शिक्षिका प्रज्ञा इनामदार, अजय सर, श्रवंती चोळकर, अर्शिया खानम, राहुल होरे, प्रभाकर भेरजे, शिवकुमार गंगोणे, पूजा धोत्रे, निकिता तायडे, प्रियंका भुमकर, दिगांबर हिंगणे, गोविंद पवार, गजानन सर, भोसले मॅडम, पुष्पा मॅडम, मोरे मॅडम, विशाल इबितवार आणि क्रीडा प्रमुख अहमद लड्डा सहित शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.