येवला : विखरनी येथील चालू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे अतिशय निकृष्ट प्रतीचे काम सुरू असल्यामुळे विखरनी गावातील ग्रामस्थ श्री. सोमनाथ बबन शेलार हे गुरुवार दि. 26/०९/२०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाची लेखी तक्रार सोमनाथ शेलार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली. परंतु प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित सुरू असलेल्या हे काम अशाच प्रकारे सुरू राहावे असे का? यामागे काही राजकीय लोकांचा दबाव असल्याचे सोमनाथ शेलार यांनी सांगितले. विखरनी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे हे बोगस निकृष्ट दर्जाचे काम पाडून पुन्हा नवीन उत्कृष्ट दर्जाचे काम सुरू करावे अशी मागणी श्री. सोमनाथ शेलार यांनी केली आहे. जो पर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे ग्रामस्थ श्री. सोमनाथ शेलार यांनी सांगितले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ बापू आण्णा शेलार, दिनराज शेलार, श्री अरुण आप्पा शेलार, रविभाऊ रोठे, रमेश शेलार, जनार्धन गोडसे, अनिल खरे, सागर शेलार,जालिंदर शेलार, रवींद्र पगार, विखरणी गावातील पोलीस पाटील सुभाष शेलार, सोमनाथ खरे, नवनाथ पगार, बाळासाहेब खरे, ज्ञानेश्वर खरे,दत्तू वडतकर आदी ग्रामस्थ व इतर नागरिक उपस्थित होते.
सुरू असेलेल्या कामाचे फोटो