येवला : विखरनी येथील चालू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे अतिशय निकृष्ट प्रतीचे काम सुरू असल्यामुळे विखरनी गावातील ग्रामस्थ श्री. सोमनाथ बबन शेलार हे गुरुवार दि. 26/०९/२०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाची लेखी तक्रार सोमनाथ शेलार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली होती. परंतु प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रार देऊन देखील संबंधित काम हे सुरूच होते. हे काम अशाच प्रकारे सुरू असल्यामुळे यामागे काही राजकीय लोकांचा दबाव असल्याचे सोमनाथ शेलार यांनी सांगितले. विखरनी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे हे बोगस निकृष्ट दर्जाचे काम पाडून पुन्हा नवीन उत्कृष्ट दर्जाचे काम सुरू करावे अशी मागणी श्री. सोमनाथ शेलार यांनी केली होती. जो पर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे ग्रामस्थ श्री. सोमनाथ शेलार यांनी सांगितले. सोमनाथ शेलार यांच्या उपोषणाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा देत उपोषणस्थळी भेटी देत व त्या कामाची पाहणी करून त्यांची मागणी बरोबर असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे सर , येवला – लासलगाव विधानसभा भाजपा प्रमुख अमुता पवार , विधान परिषद माजी आमदार नरेंद्र दराडे , शिक्षक आमदार किशोर दराडे , ऍड.माणिकराव शिंदे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर , हरिभाऊ सोनवणे , भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब डमाळे , जेष्ठ नेते तात्यासाहेब लहरे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल आण्णा शेलार , ज्येष्ठ समाजसेवक कौतिक नाना पगार या सर्वांनी प्रशासनातील अधिकारी श्री. कुलकर्णी, जोशी यांना निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार दिली असताना तुम्ही पुढे काम कसे चालू ठेवले असा जाब विचारला. अखेर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि सदर ठिकाणी विखरनी येथे सुरू असलेले आरोग्य उपकेंद्र इमारतीचे बांधकाम पाहून लेखी स्वरूपात मागण्या मान्य करीत सदरील उभे केलेले नीत्कृष्ट दर्जाचे उभे केलेले पिलर बदलून पुन्हा नवीन उत्कृष्ट रीत्या नवीन पिलर एक महिन्याच्या आत बांधून देण्यात येईल असे बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री कुलकर्णी यांनी लेखी स्वरूपात उपोषणकर्ते श्री सोमनाथ शेलार यांना पत्र दिले. सदरील मागण्या मान्य झाल्यानंतर श्री सोमनाथ शेलार यांचे तीन दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर खासदार श्री भगरे सर यांनी सोडवीले. यावेळी भाऊसाहेब ठोंबरे , दिलीप शेलार , आण्णासाहेब गोडसे,रवींद्र पगार,सागर शेलार, विठ्ठल नामदेव शेलार , राजेंद्र पगार , बाळासाहेब खरे , रविंद्र रोठे , रमेश शेलार , आनिल खरे, जनाभाऊ गोडसे , जालिदर शेलार , नवनाथ पगार रविंद्र शेलार, वाल्मीक शेलार ,पाडुरंग कदम ,दत्तु वडतकर , ज्ञानेश्वर खरे , मुनीरभाई शहा ,राजु खुरसणे , आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.