धर्माबाद (वार्ताहर) येथील एसबीआय बँकेचे शाखाधिकारी राजेश रेगुल यांनी येथील पेन्शनर्स कर्मचाऱ्यांची बैठक दि.२४ ऑक्टोबर रोजी घेऊन त्यांच्या अडी अडचणी विचारून घेतले आहेत. पेन्शनर्स ला कोणकोणत्या सवलती आहेत याची माहिती देवून कोणत्याही अडचणी आसल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आश्वासन दिले आहे.
पेन्शन लोन वयाच्या 76 व्या वर्षापर्यंत घेता येते, गोल्ड लोन घेणे, ज्यांनी नॉमिनेशन केले नाही अशांनी फार्म भरून द्यावा, पेन्शनर्स साठी वेगळी लाईन करणे, फसवणूक होणार नाही यांची काळजी घेणे इत्यादी बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. यावेळी फिल्ड ऑफिसर अरहमखान यांनी अनेक योजनेची माहिती दिली.
बैठक सुरू करण्यापूर्वी पेन्शनर असोसिएशनचे ता. सचिव कै. जी.बी.पांचाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पेन्शनर्स असोसिएशनचे ता. अध्यक्ष जी.पी. मिसाळे, जि. सदस्य शेख हुसेन चौधरी, बी.पी.कुदाळे यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आहे.
या बैठकीस गोपाळराव गुब्बी, शंकरराव कामीनवार, गंगाधर चातरमल, रणजीत पालकृतवार, दिगंबरराव कदम, वाघमारे सिद्धार्थ, सय्यद खय्यायामोद्दीन, सुरेश देवे, टी. जी. तुरे, सिताराम कासराळीकर, यांची प्रमुख उपस्थिती होती, बी.पी. कुदाळे यांनी आभार मानले.