धर्माबाद प्रतिनिधी
89 नायगाव विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवणारे डॉ. माधव विभुते यांच्या धर्माबाद शहरातील डॉ. बुरांडे हॉस्पिटलच्या समोर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक जे.के. जोंधळे तथा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष एकनाथ जिंकले, महासचिव गौतम देवके, सुभाष कांबळे भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष, मोहन पांचाळ, कपिल वाघमारे युवा आघाडी तालुकाध्यक्ष, रोहित रामटक्के युवा आघाडी शहर प्रमुख, बालाजी घायाळ, साईनाथ जिंकलोर, पिराजी उरेकर,शिवा संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप पाटील जवळेकर, बसव ब्रिगेड तालुकाध्यक्ष देविदास पाटील विभुते, बिलोली बसव ब्रिगेड तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील भोसिकर, संजय पाटील आनेराये बेलदारकर, जीवन पाटील गाडीवान,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सदानंद देवके, युवा नेते सतीश पाटील माळगे, अनिल पाटील मुंडकर, संतोष पाटील दर्यापुरे चोंडीकर, साईनाथ पाटील बनाळीकर , दिगंबर पाटील खपाटे, साईनाथ पाटील बामणीकर, लक्ष्मण कांबळे, सुभाष कांबळे, सदानंद तानुरकर, बालाजी शेटकर सोसायटी चेअरमन ,वंचित बहुजन आघाडीचे धर्माबाद, उमरी ,नायगाव तिनीही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी च्या धर्माबाद येथील प्रचार कार्यालयामध्ये महासचिव गौतम देवके, एकनाथ जिंकले, जीवन पाटील गाडीवान, वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक जे.के.जोंधळे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. उमेदवार डॉ. माधव विभुते यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे की माझ्यासाठी दोनच जाती आहेत ते म्हणजे स्त्री आणि पुरुष असे त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केले व जर मी आमदार झालो तर माझं परी हॉस्पिटल मोफत देऊन टाकणार आहे व नायगाव विधानसभेतील धर्माबाद उमरी नायगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये माझे परी हॉस्पिटल उभे करून प्रत्येक तालुक्यात मोफत देऊन टाकणार असे आपल्या मनोगतांमध्ये व्यक्त केले. मी कोणाला पाढण्यासाठी उभा झालो नाही तर निवडून येण्यासाठी उभा राहिलो आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयामध्ये डॉ.माधव विभुते आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. माधव विभुते तथा मार्गदर्शक जे.के. जोंधळे दादा व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शंकर पाटील काळे बनाळीकर यांचे वंचित बहुजन आघाडी मध्ये काल पक्ष प्रवेश झाले.
धर्माबाद तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते व डॉ. माधव विभुते यांचा असंख्य मित्रपरिवार तथा पत्रकार बांधव उपस्थित होते. नायगाव विधानसभा मतदारसंघातील नवा चेहरा म्हणून उमेदवार डॉ. माधव विभुते तिनी तालुक्यात पसंतीचा उमेदवार म्हणून पुढे आहेत. डॉ.माधव विभुते यांच्यासोबत गाड्यांचा ताफा नाही कार्यकर्त्याचा गराडा नाही राजकीय घराणेशाहीचा वारसा नाही
त्याच प्रस्थापितांना पुन्हा पुन्हा मतदान करून थकलेल्या हातांना नवीन उमेदवाराचा शोध होता सामाजिक कामाची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ.माधव विभुते यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनता डॉ. माधव विभुते यांच्यासोबत आहे असे वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक जे.के.जोंधळे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.सूत्रसंचलन जीवन पाटील गाडीवान यांनी केले तर आभार महासचिव गौतम देवके रोशनगावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.