ग्राहक उपभोक्ता समितीचे तालुकाध्यक्ष संजय उबाळे यांची तहसीलदाराकडे मागणी !
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा होतो परंतु सिंदखेडराजा तालुक्यातील काही राशन दुकानदारांनी एक किलो कमी धान्य दिले असल्याची गोपनीय माहीती ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष संजय उबाळे यांच्याकडे आली ‘त्यानंतर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे सिनखेडराजा तालुका अध्यक्ष संजय उबाळे यांनी सिंदखेडराजा तहसीलदार यांच्याकडे दिनांक ८मार्च रोजी निवेदन दिले ‘त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे की सिंदखेडराजा तालुक्यामध्ये काही ठिकाणी एक किलो धान्य कमी दिल्या गेले आहे ‘राशन दुकानदारांना विचारले असता त्यांनी वरूनच एक किलो धान्य कमी देण्यात आले असल्याचे सांगितले आहे ‘त्यामुळे नेमके वरून म्हणजे कुठून एक किलो धान्य कमी आले आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे ‘गोरगरिबांना केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य पुरवली आहे ‘त्यामुळे सदर प्रकरणाची गोपनीय चौकशी व्हावी व .सिंदखेडराजा तालुक्यातील प्रत्येक राशन दुकानदाराचे वजन काटे गोपनीय तपासून घ्यावे अशी मागणी सुद्धा संजय उबाळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे ‘