मांडवगण फराटा :
मांडवगण फराटा ता. शिरूर (दि.१एप्रिल) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मांडवगण फराटा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात वि.का.स.संस्था अध्यक्ष गोविंद फराटे, शिवसेना ता. अध्यक्ष सुधीर फराटे, गणपत फराटे,दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, हरिमामा फराटे ,शहाजी आडगळे यांनी सरस्वती पूजन ,दीपप्रज्वलन करून केली.
इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लहान असूनही मुलांनी धाडसाने स्टेजवर कार्यक्रम सादर केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, समूह गीते,बंजारा नृत्य ,एकांकिका, विनोदी गीतांवर नृत्य हे विशेष आकर्षण या कार्यक्रमात पाहण्यास मिळाले.यापूर्वी मोठ्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम खूप झाले परंतु या लहान मुलांच्या कार्यक्रमाने वेगळीच रंगत आणली.संपूर्ण पटांगण पालक,मुले ,प्रेक्षक यांनी भरले होते तरीही सर्व कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला. मुलांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद मिळाली त्यामुळे मुलांचा उत्साह आणखीनच वाढला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सतीश नागवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश फराटे, उपाध्यक्ष संदिप जगदाळे,आदर्श शिक्षक भागवत करखीले,देवीदास कुंभार,आप्पा संकपाळ, पतंगराव शिंदे ,शिक्षिका ज्योती कर्डीले,अर्चना जगताप,माधुरी बावणे,पूनम अडसूळ,चैत्राली घाटे,शिल्पा साळुंखे व इतर यांनी मुलांकडून गेली पंधरा दिवस अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे सादरीकरण केले. कार्यक्रमात लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टीम दीपक काळे यांनी दिले .
यावेळी मांडवगण फराटा,वडगाव रासाई ,शिरसगाव,पिंपळसुटी, इनामगाव येथील शिक्षक, पालक,पदाधिकारी तसेच मांडवगण फराटा ग्रा. पं.सरपंच समीक्षा कुरुमकर,ग्रा. पं. सदस्य अमोल शितोळे,बेबीताई चव्हाण, मनिषाताई मेहेर ,भाऊसाहेब कोळपे,विजय फराटे, ,हनुमंत पंडित,नंदकुमार पवार ,बालाजी कांबळे,उमाजी जाधव ,अतुल वाळके, आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ ,महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना जगताप यांनी तर आभार मुख्या.सतीश नागवडे यांनी मानले.