बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया प्रतिनिधी विवेक जगताप मो. नं.9112843318
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात काही बदल करण्यात आले आहेत. या बदला अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व अनुसूचित जाती /जमातीतील मुले व सर्व मुलींना शैक्षणिक वर्ष 2023-24 मोफत शाळेचा गणवेश दिला जाईल. प्रस्तुत योजनेअंतर्गत केवळ सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापुरता एका गणवेशाचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासनामार्फत या शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात येणार आहे. असे दोन गणवेश मिळणार आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे.