बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
श्री शिवाजी हायस्कूल इसोलीने याही वर्षी 2023ला आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत, पुनम गजानन वाकळे ने शाळेचा दैदिप्यमान इतिहास उज्वल केला. मार्च 2023 ला झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत एकूण 65 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत 14 , प्रथम श्रेणी 33, द्वितीय श्रेणीत 17 तर पास श्रेणीमध्ये 01 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतून प्रथम क्रमांक पुनम गजानन वाकळे 91.60 द्वितीय क्रमांक चैतन्य देवानंद डाळिमकर 90.60, तृतीय क्रमांक धनश्री रमेश कोकाटे 87.20 तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून श्रद्धा सुनिल गवई 79.40 गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राजक्ता समाधान घनघाव, वैष्णवी सुभाष खरात, नीलिमा गजानन चव्हाण, मैथिली सुनील गवई ,पुनम दिनकर गवई, चेतन मनोहर गवई, वैष्णवी मिलिंद गवई, भक्ती प्रल्हाद भागवत, सोमेश प्रमोद भागवत, संदेश रामेश्वर वाकळे, वैष्णवी प्रकाश गवई, विश्वास राजू खंडागळे, सुमित संतोष येवले, पायल रतन गवई, साक्षी अनंथा महाजन, संकेत गजानन कंकाळ हे विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले. दि.3जून ला पुनमच्या घरी जाऊन पुनम चे व प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक हि.रा.गवई सर व मेरतकर सर यांच्या हस्ते बुके, प्रेझेंट पेढे भरवुन कौतुक करण्यात आले. शाळेचा विषय निहाय निकाल मराठी 98.46, इंग्रजी 100 टक्के, हिंदी 100%, गणित 100% ,विज्ञान 100% सामाजिक शास्त्र 100% असा लागलेला आहे. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक एस. एस. जाधव सर ,वर्गशिक्षक हि.रा .गवई सर मेरतकर सर, चव्हाण सर, सूर्यवंशी सर, कुटे सर, जाधव सर,सपकाळ सर, वानखडे सर, येवले सर व आपल्या पालकांना देतात. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर इसोली पंचक्रोशीतून पालकांतर्फे व गावकऱ्यांना तर्फे अभिनंदनचा वर्षाव होत आहे.