येवल्याचे भाग्यविधाते येवलाचा विकास करणारे मा. श्री. छगनरावजी भुजबळ यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेतच पण त्यांचे निकट वर्तिय म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मोहन खंडू शेलार यांना सध्याचे राजकीय घडामोडी बद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सांगितलं की तुम्ही कुठल्या पक्षासोबत आहात किंवा कोणासोबत आहात हे विचारल्यानंतर त्यांच उत्तर असं होतं की माझे दैवत माननीय श्री.छगनरावजी भुजबळ हे आहेत आणि यांना सोडून मी कुठेही जाणार नाही मी राष्ट्रवादी पक्षात असून, मा.छगनरावजी भुजबळ हेच आमचे नेते आहेत असं बोलताना डॉक्टर मोहन शेलार यांनी सांगितले.
त्यामुळे असं वाटते की पक्ष कुठलाही असू द्या पण ज्या ठिकाणी गावचा विकास होतो तिथे गावातली लोक किंवा कार्यकर्ते त्या व्यक्तीला सपोर्ट करतात किंवा त्यांच्या बाजूने त्यांचे मत व्यक्त करतात त्यामुळे कितीही निवडणुका झाल्या तरी असं वाटतं येवला तालुक्यामध्ये कितीही पक्ष कोणी बदलले तरीही छगन भुजबळ यांचे वर्चस्व राहील..
येवल्यातील काही कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्यांचेही असे म्हणणे आहे की आम्ही भुजबळ साहेबांसोबत आहोत त्याचे कारण असे की येवला तालुक्यातील विकास करणारे एकच व्यक्तिमत्व आता येथे उभे आहे ते फक्त भुजबळ साहेब पाटोदा असू द्या चिचोंडी असू द्या विखरणी असू द्या पारेगाव असू द्या धुळगाव किंवा असे तालुक्यातले अनेक गाव आहेत यातील कुठलेही गावांमध्ये फक्त एकच नाव असतं ते म्हणजे भुजबळ साहेब..