मांडवगण फराटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर बेताल वक्तव्य केल म्हणून सदाभाऊ खोत यांच्या निषेध नोंदवला गेला. मांडवगण फराटा गावातील मुख्य रस्ता रोखून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला .यावेळी जेष्ठ नेते दत्तात्रय आबा फराटे मा.संचालक रा.प. घोडगंगा स.सा.का. , शंकरराव फराटे मा.संचालक रा.प. घोडगंगा स.सा.का,समाजिक कार्यकर्ते बाळासाहेब फराटे , संभाजी आप्पा फराटे संचालक रा.प. घोडगंगा स.सा.का., संतोष फराटे मा.चेअरमन मां.फ.वि.का.सेवा सो.,माणिकराव फराटे, डी.के. शितोळे ,शंकर पवार,गणेश फराटे,सुरेश जगताप,धनंजय फराटे , समीर फराटे ,राजेंद्र पोळ,गणेश लगड , महेश जाधव,भिवाजी थोरात, संदिप हैंद्रे, सय्यद गुरुजी, तुकाराम थोरात, विशाल थोरात जयसिंग हराळ आणि ग्रामपंचायत सदस्या प्रतिभाताई बोत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.