नाशिक/नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे रोहिले बुद्रुक येथे विद्युत मंडळाचे अधिकारी अधिकारी व कर्मचारी मनमाने कारभार करत असून राजकारण करत असल्याचा आरोप करत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी आरोप केला आहे. वीज मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैळीच दखल घटना घेतल्यास वीज मंडळाचे विरोधात अमर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक हे गाव खारी बृहत लघु सिंचन तलाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे नवीन जागेवर नवीन जागेवर स्थलांतर झाले आहे. गावठाणा मध्ये खारी बृहत लघु सिंचन पाटबंधारे उपविभाग कन्नड तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांच्यामार्फत यांच्यामार्फत विद्युत पोल बसवुन त्या विद्युत पुरवठा नागरिकांना मिळावा यासाठी तारा देखील बसविण्यात आल्या होत्या. विद्युत मंडळाच्या मौजे रोहिले बुद्रुक येथे वीज चोरी थांबविण्यासाठी विद्युत पोलवर तार उघडी नसलेली केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. परंतु विद्युत मंडळाचे कर्मचारी व अधिकारी यांनी गावामध्ये ज्या भागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आदिवासी समाजाचे लोक राहतात त्याच भागात केबल वायर टाकली आहे. सर्वसाधारण, जनरल लोक राहतात त्या ठिकाणी केबल वायर टाकले नाही. त्यामुळे वीज कर्मचारी व अधिकारी राजकारण करून जातिवाद करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. तसेच या गावातील पोलवरील विद्युत तारा विज मंडळांने बसवलेल्या नसताना देखील त्यांचा फक्त लाईन सप्लाय वीज मंडळाचा आहे. मात्र या तारेवर व पोलवर कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना त्यावर संपूर्ण अधिकार हा ग्रामपंचायतीचा असताना देखील. ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचे पत्र न देता तारा काढून घेऊन जात आहेत. तारा काढून वीज मंडळ प्रशासन विक्री करत आहे की काय असा संवाद येथे नागरिकांसह ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य करत आहेत. रोहिले बुद्रुक येथून जवळच असलेल्या कामावरील तारा दोन वर्षापासून चोरी गेलेला असताना देखील त्या ठिकाणी तारा जोडले नाहीत शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे वीज मंडळाचे कर्मचाऱ्यांना अधिकार्यांना आहे का? येथील तारा घेऊन जातात. मात्र सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना सांगतात की तारा उपलब्ध नाहीत. विद्युत मंडळाचे कर्मचाऱ्यांनी येथील गावातून तारा नेऊन काय करतात. तरी विद्युत मंडळाचे कर्मचारी वधिकारी यांनी राजकारण करून जातिवाद करणे थांबवले नाही तर आम्ही आमरण उपोषण करून आंदोलन छोडू तसेच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा व माजी सभेत ठराव करून वीज मंडळ कर्मचाऱ्यांच्या विरोधात ठराव करून लोकशाही मार्गाने वरिष्ठ अधिकारी शासनाकडे शासनाकडे न्याय मागू असेही येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी म्हटले आहे.