बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
नांदुरा तालुक्यातील दहिवडी गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या कोलासर या गावात १४ एप्रिल २०२३ ई क्लास मध्ये असणाऱ्या जागेत बौध्द बांधवांनी निळा झेंडा रोवला होता याचा राग मनात धरून गावातील काही मनुवादी विचाराच्या लोकान कडून विरोध करित येथील निळा झेंडा काढीत बौध्द समाजावर बहिष्कार टाकण्यात आला होता याचा निषेध व्यक्त करत बौध्द बांधवांनी 23 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय तेथे उपोषण सुरु केले आज दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांच्या हस्ते हे सोडविण्यात आले तहसीलदार आणि एस डी एम यांच्या सोबत तब्बल पाच तास चर्चा करत समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेत लेखी आश्वासना नंतर हे उपोषण मागे घेतले या वेळीं उप विभागीय अधिकारी तहसीलारांसह वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग, तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे, युवा तालुका महासचिव राष्ट्रपाल सपकाळ, गिरीष उमाळे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते