धर्माबाद (वार्ताहर गजानन वाघमारे) येथील सरस्वती नगर येथे राहणारी महिला कार्यकर्त्याच्या विरुद्ध वाईट हेतूने पाठलाग करणे, चारित्र्यावर संशय घेऊन बदनामीचा प्रचार करणे, जीवे मारण्याची धमकी देणे. इतर कारणावरून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यावरून डॉ. सुधीर शेषराव यलमे यांच्यावर विनयभंग कलम 354,354 D,294,506 या कलमाप्रमाणे दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, दि. एक ऑक्टोबर2023 रोजी दुपारी दीड वाजता एक सामाजिक व राजकीय सक्रिय कार्यकर्त्या महिला धर्माबाद येथील साईबाबा चौकात आली असताना डॉ. सुधीर शेषराव येलमे यांनी त्या महिलेच्या चारित्र्यावर अश्लील भाषेत शिवीगाळ केली की ते शब्द आपण वर्तमानपत्रात छापू शकत नाहीत, एवढेच नाही तर तुझे शारीरिक संबंध कोणाशी आहेत, तुला राजकारणात टिकू देणार नाही, गुंडे लावून तुला मारून टाकतो, अशी अश्लील शिवीगाळ केल्याने त्या संतप्त महिलेने त्याचा गळा पकडून पोलीस स्टेशन मध्ये नेऊन गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलाही सुशिक्षित व सामाजिक कार्यकर्ते असून त्याच नगरात राहते. डॉ. सुधीर येलमे हे अनेक लोकांना गंडविले आहे, अशीच अनेक लोकांची बदनामी केलेली आहे. अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव निर्माण केला आहे, धर्माबाद पोलीस स्टेशनमध्ये अशी नोंद आहे. इतरांना ब्लॅकमेल केल्याप्रमाणे या महिलेसही तो वाईट हेतूने तिचा पिच्छा सुरू केला होता म्हणून जाब विचारत पोलीस स्टेशनला घेऊनआली आहे हे विशेष . या तिच्या धैर्याबद्दल कौतुक होत आहे.
पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंतोजी विजयकुमार यांनी गुन्हा दाखल केला असून येलमे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांचा ही तपास करीत आहेत.
डॉ. सुधीर येलमे यांनी अनेक लोकांना गंडविल्याचे प्रकरण पुढे येत असून ते पण तक्रार देण्याच्या तयारीत आहेत. त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याची हिम्मत करणाऱ्या महिलेस अशा राजकीय पक्षातील गुंड लोकांपासून जीवितास धोका असल्याचे शहरात बोलले जात आहे.