धर्माबाद -( गजानन वाघमारे)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळातर्फे मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत यवतमाळ विभाग पथकांकडून दि.६ आँक्टोबर रोजी धर्माबाद बसस्थानकाचीपहाणी करण्यात आली.यावेळी पथकाकडून पहाणी करुन धर्माबाद बसस्थानकातील स्वच्छता बदल कौतुक केले.राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यात बसस्थानकाची स्वच्छता अभियान सध्या सुरू असून या अंतर्गत इतर जिल्ह्यातील विभागांतील पथकाकडून बसस्थानकाचे मूल्यांकन करण्यात येत आहे. जय यवतमाळ विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत धर्माबाद बस स्थानकांचे. मूल्यांकन करून परिसराची पाहणी करण्यात आली. या मूल्यांकनांतर्गत चार टप्प्यात बसस्थानकाच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात धर्माबाद बसस्थानकाची कामगिरी समाधानकारक झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तपासणी ६ आँक्टोबर रोजी करण्यात आली. धर्माबाद बस स्थानकाच्या परिसरातील स्वच्छता पाहून यवतमाळ येथील पथकाकडून धर्माबाद बसस्थानक प्रमुख व बिलोली चे आगारप्रमुख सुभाष पवार यांचे कौतुक करण्यात आले .या पथकात यवतमाळचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी,विभागीय अधिकारी सतीश पलेरिया,विभागीय सांख्यिकी अधिकारी संदीप कोडापे, नांदेड येथील यंत्र अभियंता मंगेश कांबळे,विभागीय वाहतूक अधीक्षक साळुंखे आगारप्रमुख सुभाष पवार, वाहतूक नियंत्रक व्हि.एन.अनमोड,एस आर घंटे,पत्रकार लक्ष्मण तुरेराव,कुणाल पवारे, सुरेश घाळे,गजानन चंदापुरे,बाबुराव गोणारकर यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.