धर्माबाद (वार्ताहर) “प्रत्येका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री चा मोठा सहभाग असतो” या म्हणीप्रमाणे कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुखदु:खात सदैव खंबीरपणे पाठीशी ऊभी राहून वेळोवेळी त्यांना साथ देणारी त्यांची अर्धांगीनी रमाबाई आंबेडकर यांची 126 वी जयंती फुले नगर येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.
फुले नगर धर्माबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे तथागत भगवान बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करण्यात आले. व नालंदा बुध्द विहारात भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष सदानंद देवके यांच्या हस्ते पुजापाठ करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सचिव गौतम देवके, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर, पत्रकार तथा शाहिर नारायण सोनटक्के यांनी माता रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. तसेच रमाई जयंती सर्वांना खिरदान करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय गायकवाड, शंकरराव सोनटक्के, चंद्रकांत वाघमारे, शंकरराव कांबळे, पत्रकार सुदर्शन वाघमारे, पत्रकार गणेश वाघमारे, राहुल भूतनरे, आनंदा सोनटक्के, सुमनबाई बगारे, निलाबाई वडमारे, सत्यभामा मोरे, सुमनबाई कांबळे, सुशिलाबाई सोनकांबळे यांच्यासह अनेक उपासक व उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुधाकर वाघमारे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई जयंती मंडळाचे रोहित रामटक्के, सतिश गायकवाड, रोहित मृदुंगे, बाबासाहेब घागळे, विजय गवळे, चंद्रकांत सोनटक्के, सुमेध वाघमारे, श्रीकांत सुर्यवंशी, चंद्रकांत घागळे, रोहन मृदुंगे, जाधव, शिलवान कांबळे, शुभम वाघमारे, कुणाल पवार, अजय वाघमारे, अमोल कांबळे, संदीप कांबळे यांनी परिश्रम घेतले.