बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान देऊन देशातील प्रत्येक नागरिकांना स्वातंत्र्य बहाल केले यात सर्वात मोठे योगदान त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आहेत यांच्या त्यागामुळेच हे शक्य झाले असे विचार चिखली चे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ गौरव महिन्द्रे यांनी व्यक्त केले.सविस्तर असे कि ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष भोकर येथील प्रतिष्ठित प्रकाश वानखडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिखली येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ गौरव महिन्द्रे होते तर प्रमुख उपस्थितीत नेत्र रोग तज्ञ डॉ स्वप्नील मोरवाल, बालरोग तज्ञ डॉ निरंजन काळे हे होते.तसेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे निराधार बेघर वयो वृद्धाची निःस्वार्थ सेवा करणे म्हणजे खरी देव पूजा आहे. स्वतः चे आई वडील असून त्यांना ते सांभाळत नाही पण या वृद्धाश्रमात च्या माध्यमातून प्रशांत डोंगरदिवे व सौं रुपाली डोंगरदिवे हे सेवा करीत आहे आणि आज त्यागमूर्ती माता रामाईंच्या जयंती निमित्त आम्हाला सुद्धा सेवेची संधी प्राप्त करून दिली असे मत नेत्र रोग तज्ञ डॉ स्वप्नील मोरवाल यांनी व्यक्त केले.तसेच वृद्धाश्रमातील वृद्धासह भोकर येथील गरजू रुग्णाची अस्थी रोग, नेत्र रोग, बाल आजार व इतर आजाराची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी भास्कर वानखडे, तेजराव डोंगरदिवे, किसना डोंगरदिवे, मधुकर डोंगरदिवे, राजरत्न हिवाळे, सुमेध गवई, किरण डोंगरदिवे यांनी सहकार्य केले तसेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे सूत्रसंचालन यांनी तर आभार प्रदर्शन संचालिका सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले.