अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा दि. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला , याच दिवसाचे औचित्य म्हणून गेल्यावर्षी पासून ता. ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा करावा या महाराष्ट्र राज्य सरकारच्या आध्यादेशाचे पालन करत आज चिकना ग्राम पंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कलश पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ सुमनबाई विश्वासराव आवरे व ग्रामरोजगार सेवक तथा तालुका आध्यक्ष गणेश वाघमारे,व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन सामुदायिकपणे राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.सुमनबाई विश्वासराव आवरे ,देविदास आवरे,सरपंच प्रतिनिधी विश्वासराव आवरे,ग्रामरोजगार सेवक तथा तालुका आध्यक्ष गणेश वाघमारे ,सुरेश बुन्नावार ,शंकर जिल्हेवाड ,साहेबराव खंदारे , आदींची उपस्थिती होती.