धर्माबाद (वार्ताहर) येथील नगर परिषद सभागृहात दिनांक २६ जून रोजी आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद तालुक्यातील विकासात्मक कामाबाबतीत जनतेकडून अपेक्षा जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजीत केला होता.
सदरील कार्यक्रमात पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून बोलतांना जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी. पी. मिसाळे सर यांनी धर्माबाद तालुक्यात रोजगार वाढावे, नविन उद्योग धंदे यावेत ही सार्वजनिक विकासाची अपेक्षा व्यक्त करीत उदाहरणार्थ शेजारील उमरी तालुक्यात शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरूजी यांनी साखर कारखाना, पतसंस्था, दुग्ध व्यवसाय उभे करून हजारो तरुणांना काम दिले तसे धर्माबाद तालुक्यात का होत नाहीत असे मत मांडले. नेमकी हीच बाब आमदार राजेश पवार यांच्या अपयशाची ठरणारी दिसताच त्यांच्या पत्नी तथा भाजपा ग्रामीण महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.पूनम राजेश पवार यांनी तुम्ही कवळे गुरुजीची सुपारी घेऊन बोलत आहात का? असे म्हणत जेष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे यांचा अवमान करणारे वक्तव्य केले.
जनता दरबारात विकासात्मक विषयावर बोलणारे जेष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे यांच्या झालेल्या अपमाना बद्दल सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे व पोलीस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
सौ. पूनम पवार यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया यावेळी निवेदनात नमूद करण्यात आली.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण तुरेराव, बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पोतना लखमावाड, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान कांबळे, धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर, प्रेस संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, संपादक शिवराज पाटील गाडीवान, उपसंपादक सुधाकर जाधव, संपादक मनोज बुंदेले, संपादिका विजयालक्ष्मी सोनटक्के, पत्रकार कृष्णा तिमापुरे, सुदर्शन वाघमारे, गंगाधर धडेकर, गिरमाजी सूर्यकार, गणेश वाघमारे, बाबुराव गोणारकर, लक्ष्मण पाटील येताळे, मीना राजू भद्रे, गजानन वाघमारे, गणपत जटाळकर, गजानन चंदापुरे, सिद्धेश्वर मठपती, व्यंकटराव डोईवाड, माधव हनमंते, किशन कांबळे, गणेश पाटील हातूनरे, राहुल वाघमारे, गजानन कुलकर्णी, लालाजी इमनेलु, सुरेश घाळे, सोमेश स्वामी यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.