अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने मौजे चौफुला येथील बोरमलनाथ येथील सांस्कृतिक सभागृहात तिसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात मांडवगण फराटा येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हनुमंत फराटे यांना जेष्ठ साहित्यीक संजय सोनवणी यांच्या हस्ते “राज्यस्तरीय सामाजिक कार्यगौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हनुमंत अण्णा फराटे हे गेले पाच ते सहा वर्षांपासून गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. गावातील वेगवेगळ्या प्रकारचे तंटे मिटवण्यामध्ये त्यांचा हतखंडा असल्याने गावाने त्यांना तिसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. गावचे आदर्श पोलीस पाटील बाबासो पाटील फराटे यांच्या सोबत हनुमंत फराटे यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमी तत्पर राहून हजारो तंटे अण्णांनी मिटवून गावाला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
“भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हनुमंत फराटे यांना “सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2024″ ने सन्मानित केले हे त्यांच्या कामाची पावती आहे. मांडवगण फराटा हे शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून या भागात राज्यातील विविध भागातील लोकं उपजीविकेसाठी राहत असल्याने या भागात वेगवेगळे तंटे होत असतात ते सोडवण्यासाठी हनुअण्णा नेहमी अग्रेसर राहून उत्कृष्ट काम करत आहेत. शासनाचा कोणत्याही प्रकारचा निधी नसताना स्वखर्चाने शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरी जाऊन तंटे मिटवणे हे जिकिरीचे असूनसुद्धा अण्णांच्या प्रामाणिक कार्याबद्दल त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कामाची पावती आहे.असे मत आदर्श पोलीस पाटील, बाबासो पाटील फराटे यांनी केलं . आणि हनुमंत अण्णा फराटे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती यांनी आपले म्हणणे यावेळी मांडले की ” मी प्रमाणिक पणे केलेल्या कामाची पावती म्हणून हा पुरस्कार मिळाला असून, आई वडीलांची पुण्याई , सर्व ग्रामस्थांचे सहकार्य, बंधु भगिनींचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याने मी गावची कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी नेहमी प्रयत्न केला आहे. विविध प्रकारचे तंटे मिटवण्यासाठी गावचे पोलीस पाटील बाबासो पाटील फराटे यांचे नेहमी मोलाचे सहकार्य लाभल्याने अनेक तंटे मिटवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हा पुरस्कार आपणा सर्वांना समर्पित करून मिळालेल्या पुरस्काराने मला अजून प्रेरणा मिळाली आहे. “
यावेळी आदर्श पोलीस पाटील बाबासो पाटील फराटे, गणेश फराटे, राजू कांबळे, सुरेश ढमढेरे, तुकाराम फराटे, किसन भोसले, सागर वेदपाठक, धनंजय फराटे पाटील, किशोर फराटे, गोरख फराटे,संदीप गिरे, संजय सोनवणे, दीपक पवार, राज्याच्या विविध भागातून आलेले कवी, लेखक, साहित्यिक, गायक, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार आदी उपस्थित होते.