ता. २४ शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने संघाचे माजी चेअरमन व विद्यमान व्हाईस चेअरमन माननीय श्री बाळासाहेब नागवडे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थित परिक्रमा शैक्षणिक संकुल उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे, मा. चेअरमन सुनील नागवडे , मा. उपसरपंच रवींद्र टेकवडे , संचालक अमोल नागवडे, मा. चेअरमन संजय नागवडे पाटील,विद्यमान संचालक अंकुश मचाले, सुभाष गवळी,मा.संचालक शिवाजी नागवडे , जालिंदर नागवडे मा चेअरमन, प्रभाकर रणदिवे आदी सर्वांच्या उपस्थितीत संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे चे नवनिर्वाचित चेअरमन मा श्री मनोहर संभाजी मचाले यांची चेअरमनपदी व मा सौ सुनीता संजय नागवडे यांची व्हा चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या कार्यालयामध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थाचे चेअरमनपदी हरिभाऊ अमृतराव नागवडे व व्हा चेअरमनपदी संतोष शिवाजी नागवडे ,तसेच बाभुळसर बु वि का संस्थेच्या तज्ञ संचालकपदी माधव मच्छिंद्र नागवडे, अभिजीत अंकुश टेकवडे यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी बापू नागवडे, अमित पाटोळे युवा कार्यकर्ते,अजित गवळी,निलेश नागवडे,पत्रकार अल्लाउद्दीन अलवी सह संघटक राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका,सहाय्यक सचिव सौरभ नागवडे, जाकीर सय्यद आदी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन बाळासाहेब नागवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की संस्थेचे संस्थापक चेअरमन कै .तुकाराम भाऊ नागवडे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन कै.अर्जुनराव तात्या नागवडे ,कै.दगडू दादा नागवडे, कै.बारीकराव दादा नागवडे,
मा श्री हनुमंत भाऊ पाटोळे,मा श्री रामराव नाना नागवडे यांनी सभासदांचे हित लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना केली. तसेच संस्थेची आजची परिस्थिती पाहता संस्था सक्षम करण्यासाठी सर्व संस्थापक व सभासदांचा खारीचा वाटा आहे .तसेच संस्थेचे क म हे २.७५ कोटी पर्यंत नेता आले आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी व आभार हरिभाऊ नागवडे यांनी केले.