सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोग करणार्या घटनांचे प्रमाण वाढले असून महाविद्यालयीन तरुणांमध्ये हा प्रकार अधिक आढळून येत आहे. सायबर क्राइमचे जाळे वाढत असून तरुणींसह तरुणांनाही याचा फटका बसत आहे. फेसबुक, व्हॉटस्अँपच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला याचे चांगलेच परिणाम भोगावे लागत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून तरुणींना याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेतील सायबर सेलमध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पाहायला मिळत आहेत.
आपल्या फ्रेंडस् गृपच्याच एखाद्या मुलीचा गैरफायदा घेत, तिचे फेसबुकचे अकाउंट हॅक करीत बदनामी करणे, अश्लील मेसेजेस करणे, अश्लील फोटोज् अपलोड करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. तरुणाईने याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
आजकाल अनोळखी व्यक्तींमध्ये सहज मैत्रीचे नाते निर्माण होते. त्यानंतर मोबाइल नंबर दिला जातो, गृपमध्ये आपला फेसबुक आयडी, ई-मेल आयडी दिला जातो किंवा एखाद्या मैत्रिणीचा तो मित्र असतो. तो त्या मुलीला त्रास देण्याच्या मार्गावर असतो. या माहितीचा गैरवापर करीत तो संबंधित तरुणीला त्रास देऊ लागतो, असे अनेक प्रकार दररोज शहरात घडत