केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारती पवार यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे विभागाला दिले आदेश.
बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया सोलापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक जगताप
दि. ८ एप्रिल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंधेरीतील कामगार विमा रूग्णालयात आगीच्या घटनेनंतर अद्याप बंद आहे. त्यामुळे अनेक कामगार लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र रुग्णसेवा संघटनेचे व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी कामगार रुग्णालय चालू करण्याची मागणी केली होती पण संबधित विभागाने याविषयी कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नव्हते. म्हणून हा प्रश्न घेऊन भिमेश मुतुला यांनी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. भारती पवार यांची भेट घेऊन कामगार रुग्णालय पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा केली. आरोग्य मंत्र्यांनी यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.