समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच..
येवला / मुंबई वरून हज यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर कडे निघालेल्या भरधाव कारचा टायर फुटून कार अनियंत्रित होऊन वैजापूरजवळ अपघात झाला. या अपघातात एक वर्षाचा चिमुकला ठार झाला तर कुटुंबातील पाच जण जखमी झाले. अखतर रझा असे मयत चिमुकल्याचे नाव असून आझाद अली खान, आफताब अली, खुशबू आलं खान, यास्मिन खान, सोहेल खान जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचारासाठी येवला येथे पाठविण्यात आले आहे. सदरचे कुटुंब हे बिहार राज्यातील छपरा येथील असून मुंबईतील वाशीत राहणारे होते. ते 17 जून रोजी गया येथून विमानाने हजयात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. समृद्धी महामार्गावर संभाजी नगर कडे जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान कारचे टायर फुटून कार अपघातग्रस्त झाली. या अपघातात गाडीचे खूप नुकसान झाले.