दि. १७ जून ते २५ जून रोजी जर्मनी- बर्लीन येथे होणाऱ्या विशेषऑलिम्पिकसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली ता. पन्हाळा येथील दीक्षा जितेंद्र शिरगावकर हिची निवड झाली आहे.या जागतिक स्पर्धेत दिक्षा २५ व ५० मीटरफ्रीस्टाईल याप्रकारांमध्ये सहभागी होणार आहे.या निवडीमुळे तिच्यावर व तिच्या कुटुंबीयांवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे. विशेष ऑलिम्पिकसाठी भारतातून विविध१६ प्रकारांमध्ये एकूण २८५ खेळाडूची निवडझाली आहे. त्यात महाराष्ट्रातून जलतरणासाठीदोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्येदीक्षाचा समावेश आहे. यामुळे कोडोली-वारणानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलागेला आहे. दिक्षाला हा पल्ला पार करणे सोपी गोष्ट नव्हती ती विशेष चाईल्ड आहे. जन्मतः एका वैद्यकीय अपघातात तिच्या काही क्षमतेचा -हास झाला. दीक्षाचे वडील जितेंद्र सिव्हिल इंजिनियर तर आई प्रज्ञा प्राध्यापिका आहे. दीक्षाने आतापर्यंत जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळवले आहे. ह्या वर्षभरामध्ये बेंगलोर मंड्या, गुजरात गांधीनगर, व दिल्ली येथे असे तीन प्रीप्रेटरी कॅम्प झालेत त्यामधून तिची निवड सन २०२३ ला जर्मनी बर्लीन येथे होणाऱ्या विशेषऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.दीक्षाला तिचे प्रशिक्षक अभय डांगे यांचे मोलाचेमार्गदर्शन लाभले आणि शाळा चैतन्य विशेषचाइल्ड स्कूल वारणानगरच्या मुख्याध्यापिका अंजना माने व स्टाफ, स्पेशल ऑलंपिककोल्हापूर क्षेत्रीयच्या मुख्य दीक्षित, विशेषऑलंपिक महाराष्ट्र प्रदेशचा मुख्य हंसिनी, तसेचमारुती बावडेकर तसेच तिचे प्रशिक्षक अभय डांगे यांचे या सर्वांचे वेळोवेळी दीक्षाला मार्गदर्शन लाभले तसेच वारणा समूहाचे अध्यक्ष आमदारडॉ. विनय कोरे यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन दिक्षाला मिळाले.