बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
बुलडाणा जिल्यातील चिखली तालुक्या मधील येत असलेले किन्होळा गाव या गावात मोठ्या प्रमाणात दारू आणि वरली व्यवसाय सुरू करण्यात आला आहे, ही दारू आणि वरली किन्होळा बस स्टॉप च्या, परिसरात व डाँ, बाबासाहेब आबेडकरयांच्या समोर च्या, व पाठी मागच्या परिसरात चालत आहे.तसेच किन्होळा गावाची ग्रामपंचायत कार्यालय व मंदिर मज्जित परिसरा जवळ वरली, मटका चालू असून, या अवैध धंदे करणाऱ्यांचा सुळसुळाट चालू आहे, तसेच ग्रामपंचायत ने गावा साठी बांधलेला आरो प्लॅन हे गाव करांसाठी न वापरा वरली मटका साठी वापरल्या जात आहे,पण आता या धंद्यांनी उधाण दिसून येत आहे, या अवैध धंद्यावर पोलीस यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे दिसून येत आहे, किन्होळा या गावामध्ये अवैध धंद्याची वाढ फार मोठ्या प्रमाणात झाली आहे, या अवैध धंद्यामुळे तरुण पिढीला व्यसन लागत आहे, काही नागरिकांचे घर उद्ध्वस्त झाले. या अगोदरच्या काळात काही प्रमाणात अवैध धंदे सुरू होते, पण आता हा व्यवसाय वार्ड वार्डात सुरू झाल्यासारखा दिसून येत आहे, याचे कारण काय आहे पोलिस यंत्रणा कमी पडत आहे , काय? बीड जामदार यांना वारण, वार बोलून सुद्धा त्यांनी आता पर्यंत कारवाई केली नाही बीट अंमलदार यांना अवैध धंदे गावात दिसत नसतील का असा प्रश्न किन्होळा वासीयांना पडत आहे, असलेअवैध धंदे मोठ्या प्रमाणात भर दिवसा व खुलेआम राजरोसपणे किन्होळा बीट मध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत. चालू असलेल्या अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या ग्रामपंचायत,वर वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी व अवैध धंदे तात्काळ बंद करावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.