नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कडुनिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये काही मंत्र लिहिलेले आहेत. तसेच काही साहित्यही आढळून आले आहे.
येवला येथे क्रीडासंकुला जवळचा हा प्रकार संशयास्पद असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची माहिती नागरिकांकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिस सुध्दा या ठिकाणी आले. हा सर्व प्रकार जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन असून संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येवला शहर पोलिसांकडे केली आहे. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय कुऱ्हाडे, आयुब शहा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
advertise