महाराष्ट्र राज्यात गेल्या वीस दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. विशेषत: विदर्भात शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे स्थलांतराची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे या परिस्थितीत कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ. रेखाताई खेडेकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते. रेखाताई खेडेकर यांनी याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांना राखी बांधली.