मांडवगण फराटा येथील पुण्याई मंगल कार्यालयात शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शासन आपल्यादारी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये भूमिअभिलेख विभाग, पंचायत समिती, तहसील विभाग, एम.एस.इ.बी विभाग,महसूल विभाग, माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे अशा अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित होते. जनतेच्या अनेक अडचणी आमदार अशोक पवार यांनी जाणून घेत त्या जाग्यावरच सोडवण्याचा प्रयत्न केला.यावेळी अजित पवार गटाचे सुधीर फराटे व त्यांचे सहकारी यांनी या उपक्रमामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा फोटो लावला नाही म्हणून प्रशासनाचा निषेध व्यक्त करून सदर कार्यकामास विरोध नोंदवला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये अनेक गरजू लोकांची न होणारी व काही वर्ष विलंब होणारी कामे आज करून देण्यात आली यावेळी सामान्य जनतेने सदर कार्यकमास उदंड असा प्रतिसाद देत आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी जनतेची कामे ८ दिवसात पूर्ण केली जातील तसेंच माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तळागळापर्यंत पोहचणव्यासाठी प्रसासनाला सूचना केल्या आहेत.जनतेची कुठ ही अडवणूक केली जणार नाही असे सांगितले.
तसेच मांडवगण फराटा येथील एका वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर चोरीला जाऊन चार महिने उलटून देखील तो बसवण्यात अडचणी येत होत्या, आमदार अशोक पवार यांनी संबंधित विभागाशी बोलून तो कार्यक्रम संपायच्या अगोदरच संबंधित ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. अशी अनेक कामे आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मार्गी लावण्यात यश आले.यावेळी आमदार ॲड.अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी राजाराम जगताप, पोलीस निरीक्षक जोतीराव गुंजवटे, उप कार्यकारी अभियंता सुमित जाधव ,सर्कल संजीव साळवी, महावितरणचे अधिकारी इर्शाद शेख, पप्पु मुंगसे,अशोक् गुळादे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, नरेंद्र माने,माजी व्हा. चेअरमन सुभाष कळसकर, माजी संचालक लतिका जगताप, दत्तात्रय फराटे,सरपंच समिक्षा फराटे, दिपाली नागवडे, माजी सरपंच पल्लवी घाटगे,माजी सरपंच सीमा फराटे, आदी उपस्थित होते.