बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
उदयनगर कडुन बुलढाणा कडे जाणारी दुचाकी डासाळा येथील पुलात कोसळली आणी दुचाकी स्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला.सदर दुचाकी स्वार सुरज विलास पवार वय २७ वर्षं हा स्वामी समर्थ नगर सागवण भाग बुलढाणा येथील रहिवासी असून तो काही कमा निमित्त उदयनगर कडे आला असावातो सायंकाळी ८.००वाजेदरम्यान घरी परतताना डासाळा येथील पुलात एम.एच.२८ ए.ए.१०७६ क्रमांकाची दूचाकी कोसळून अपघात झाला व त्याघटणेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला.ही माहिती पोलीस पाटील संदीप कुमार व सरपंच विजय मोरखडे यांना कळताच त्यांनी गावकर्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली आणी अपघाताची माहिती अमडापुर पोलिस ठाण्यात कळवली ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांनी त्वरित रूग्ण वाहीकेची व्यवस्था केली आणी मृतदेह चिखली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.हा अपघात बाळापुर ते वरवंड रोडच्या काम बर्याच दिवसांपासून सुरू आहे आणी या पुलाजवळ कंट्रक्सण कंपनीने रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे अपघाता समयी रिमझिम पाऊस पाऊस चालू होता त्यामुळे रस्ता चिक चिक झाला होता दुचाकी पुलावरून घसरून खाली जाऊन अपघात झाला असावा असी चर्चा सर्वत्र होत आहे.पुढील तपास अमडापुर पोलिस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.