मनमाड/नांदगाव (प्रतिनिधी) : राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असून राज्य शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण कायदा हा कुचकामी ठरत असून मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित नांदगाव – मनमाड पत्रकार संघाच्यावतीने आज पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची होळी करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा पत्रकार कायदा आणखी कडक करावा तसेच कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या आव्हानाला प्रतिसाद देत नांदगाव तालुक्यात पत्रकारांची एकमेव मोठी संघटना असलेल्या नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल खरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, साप्ताहिक, फोटोग्राफर, पोर्टल, युट्यूब चैनलच्या पत्रकारांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची होळी केली. यावेळी पत्रकार संरक्षण कायदा कडक झालाच पाहिजे, पत्रकात एकजुटीचा विजय असो, पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, मारुती जगधने, जगन पाटील, प्रा. सुरेश नारायने, उपाध्यक्ष सोमनाथ घोंगाने, सह सरचिटणीस संजय मोरे आदींची भाषणे झाली. सर्वांनी आपल्या भाषणात पत्रकार संरक्षण कायदा कडक झालाच पाहिजे असे आग्रहाने आपले मत मांडले. येथे निदर्शने करण्यात आली. कार्याध्यक्ष अनिल आव्हाड, सरचिटणीस संदीप जेजुरकार, उपाध्यक्ष बाबासाहेब बोरसे, कोषाध्यक्ष निलेश वाघ, सहसरचिटणीस अशोक बिदरी, प्रसिद्धी प्रमुख नाना अहिरे, प्रज्ञानंद जाधव, रुपाली केदारे, सल्लागार नरहरी उंबरे, रामदास सोनवणे आदींनी आपल्या मनोगतात पत्रकारांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची व्यथा मांडली. येथून मोटार सायकल रॅलीने काढत तहसील कार्यालयात जाऊन शासनाचे पत्रकार संरक्षण कायदा कडक कराव्यात यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. येथे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस संदीप जेजुरकार, सहकार्याध्यक्ष उपाली परदेशी यांनी निवेदन करत पत्रकारांच्या मागण्या विशद केल्या. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा करण्यात आला. २०० पत्रकारांवर हल्ले, धमक्या, शिवीगाळ झाली. ३७ प्रकरणात हा कायदा लागू केला परंतु एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली नाही. राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असून राज्य शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण कायदा हा कुचकामी ठरत आहे. पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडांकरावी त्यांच्यावर हल्ला चढविला. संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. यावेळी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे गणेश केदारे, अफरोज अत्तार, राजू लहिरे,निलेश्वर पाटील, किरण भालेकर, राजेंद्र जाधव, निखिल मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार सदस्य उपस्थित होते.
फोटो
नांदगाव : पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची होळी करतांना तर दुसऱ्या छायाचित्रात नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना निवेदन देताना नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य पत्रकार ….
(सहसंपादक – रोहन मोकळ)